सोमवारी पुसेर येथे होणाऱ्या आदिवासी समाजाच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा

 आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन




गडचिरोली : आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १९ ऑगस्ट  सोमवारला ग्रामसभा पुसेर येथे सकाळी ११ वाजता "आदिवासी समाज मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे .या आदिवासी समाज मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने केले आहे.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पुसेर परिसरात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. यानिमित्ताने या कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments