मुतनुर पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार : आमदार डॉक्टर देवरावजी होळी

 पर्यटन विकास कामांचे भूमिपून


गडचिरोली : कोविड काळात प्रसिद्धीस आलेल्या  चामोर्शी तालुक्यातील मुतनूर येथील पर्यटन विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून पर्यटन विकासासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. आपण मुतनुरच्या पर्यटन विकासासाठी आणखी निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरूच ठेवू, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुतनूर येथील पर्यटन विषयक विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी भाजपाचे जिल्हा नेते प्रणयजी खुणे, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा सरपंच माधुरी आतला, बाबुराव झुरी, भाऊराव कुमरे, विनोद कोंदामी, डी. बी. नरोटे अनिल नरोटे, सीताराम पदा, श्रीरंग नरोटे, काजल नरोटे, पिंकी नरोटे, देवाजी पुडो, कालिदास पुडो, सीताराम पदा, कान्हूजी नरोटे,  यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments