जंगली हत्तींच्या कळपाने धानपिकाचे नुकसान

चामोर्शी चेक शेतशिवारातील घटना


गडचिरोली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, बुधवारी (21) पहाटे रानटी हत्तींच्या कळपाने आरमोरी तालुक्यातील चामोर्शी चेक शेतशिवारात शिरून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेत गावातील 7 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

वडसा वनविभागात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप धुमाकूळ घालत आहे. यादरम्यान हत्तींकडून भातपिकाची नासधूस केल्याच्या घटना विविध गावात उघडकीस येत आहेत. दरम्यान, बुधवारी पहाटे रानटी हत्ती आरमोरी तालुक्यातील चामोर्शी चेक गावातील शेताच्या आवारात शिरले. येथील जवळपास 7 शेतक-यांचे धानपीक पायदळी तुडवले. यात माणिकराव निंबोड, रामा मशाखेत्री, सिद्धार्थ शेंडे, वासुदेव मंगरे, सोमेश्वर नरुले, गीता येवले, राजू श्रीरामे और मनोहर ढवले आी शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. शेतात धुडगूस घातल्यानंतर जंगली हत्तींचा एक गट खोब्रागडी नदी ओलांडून सिर्सी जंगल परिसरात गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. नुकसानीचा पंचनामा केला. वनविभागाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments