उद्या तेली समाजाच्या मेळाव्यात जेष्ट नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

तेली समाज प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक 



गडचिरोली : तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवारच्या वतीने भव्य सामाज मेळावा, जेष्ट नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन २६ ऑगष्टला दुपारी २ वाजता सेलिब्रेशन फंक्शन हॉल चामोर्शी रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

२४ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी चौक येथिल शासकीय विश्रामगृह येथे तेली समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासंघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोद पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीला जिल्हा संघटक रमेश भुरसे, जिल्हा सचिव मुक्तेश्वर काटवे, तेली समाज आघाडी महिला जिल्हाध्यक्ष लताताई कोलते, जिल्हा उपाध्यक्ष आनील कोठारे,जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथजी चांदेवार, मधुकरराव भांडेकर, गजानन बुरांडे,चेतन कोलते, एम.डी.चलाख,वसंतराव सातपुते, दिलीप चांदेवार,पद्माकर पिपरे, विलास नैताम,रमेश बोधलकर,लालाजी सातपुते व तेली समाजातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments