गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.आर आर पाटील यांची आज दि.१६ आगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यरपवार यांचे हस्ते स्वर्गीय आर आर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले . स्व. आर आर पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्री असताना ऐतिहासिक कामगिरी केली जिल्हा सदैव आभारी राहील. त्यांचे कार्य जिल्हावाशियांना सदैव स्मरणात राहील. जिल्ह्याला त्यांनी दिलेल्या भरीव योगदानांबद्दल त्यांचे स्मरण म्हणून आज त्यांची जयंती गडचिरोलीत साजरी करण्यात आली.
यावेळी विजय गोरडवार शहराध्यक्ष तथा माजी सभापती नप गडचिरोली, संगीता राऊत महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गडचिरोली, मनोहर भोयर तालुकाध्यक्ष गडचिरोली, शेमदेव चाफले ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष, नईम शेख जिल्हा उपाध्यक्ष, हुसेन शेख जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक, वृषभ गोरडवार प्रदेशउपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, प्रीती कोवे महिला शहराध्यक्ष गडचिरोली, संध्या उईके महिला जिल्हा सरचिटणीस, मीनल चिमूरकर महिला जिल्हा उपाध्यक्ष, नीता बोबाटे महिला संघटन सचिव, रमेश बोबाटे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गडचिरोली, सादिक पठाण अल्पसंख्यांक जिल्हाउपाध्यक्ष, नागोराव उईके, सुनील चिमूरकर, शाहरुख पठाण शहराध्यक्ष अल्पसंख्यांक गडचिरोली,भास्कर निमजे, राजू डांगेवार, निलेश कोटगले, ऋतुजा कन्नाके, नईमा हुसेन, मीना मावळणकर, रीना गेडाम, इमरान शेख, अविनाश बांबोडे, नवाब पठाण, आकाश पगाडे नयन खामनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments