गडचिरोली ः चामोर्शी तालुक्यातील हळदवाही टोला येथील बुद्ध विहाराच्या संरक्षण भिंत बांधकामाकरीता 10 लाख रुपये तर सार्वजनिक सभागृहाच्या बांधकामाकरीता 10 लाख रुपये असा एकूण 20 लाख रूपयांचा निधी मंजुर करून आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच नीता पुडो, उपसरपंच छत्रपती दुर्गे, जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी सुरेश शहा, अरुण दुधे, प्रवीण खेडकर, केशव दुर्गे, अजय पुडो, दामोदर मेश्राम, किशोर कुकुडकर, कवळू कुकुडकर, विवेक कांबळे, नानाजी रामटेके, रमेश चंदावार, नंदकिशोर वाळके, सोमजी गावळे, रणजित कांदो, प्रवीण गावळे, उमेश पुडो, सुखदेव तलांडे, प्रवीण मेश्राम, नवीन मेश्राम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments