प्रशिक्षित कार्यकर्ता हाच पक्षाचा आधार : अमोल पुसदकर




गडचिरोली : आज सर्व जग  व्यवस्थापन शास्त्राचे धडे आपल्या कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना त्यांच्या कामामध्ये अधिक कुशल बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. राजकीय पक्षांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना विविध विषयांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना अधिक योग्य कार्यकर्ता बनविणे आवश्यक आहे. असे मत सुप्रसिद्ध वक्ता अमोल पुसदकर यांनी दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी गडचिरोली येथील फंक्शन हॉलमध्ये आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः शूरवीर होते, उत्तम राज्यकर्ते होते. तरीही त्यांनी आपले अष्टप्रधान मंडळ बनविले व त्यांच्याद्वारे आपले स्वराज्य अधिक लोकाभिमुख केले. भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.कार्यकर्ता बनण्यासाठी आवश्यक गोष्टी कार्यकर्त्यांनी आत्मसात केल्या पाहिजे. आताचे युग हे प्रसिद्धी माध्यमांचे,समाज माध्यमांचे युग आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नॅरेटिव्ह पसरविले  जात आहे. यांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपला अभ्यास वाढविणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचा समारोप प्रज्ञा प्रवाह चे पश्चिम क्षेत्र संयोजक सुनील किटकरू यांनी केला. याप्रसंगी ते म्हणाले की आमचा पक्ष हा अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेला आहे. आमच्या पक्षाची विजयी खोडदौड कायम ठेवण्याचं कार्य हे कार्यकर्त्यांना करायचे आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःची योग्यता वाढवीत राहिली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी केले.   कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भृगुवार यांनी तर आभार प्रदर्शन भाजपा तालुका अध्यक्ष विलास  भांडेकर यांनी केले. प्रशिक्षण वर्गाला विधानसभा क्षेत्रातून नियोजित  २५० कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments