पुलखल येथे १९२ वाॅटर फिल्टरचे नि:शुल्क वाटप
गडचिरोली : ग्रामीण भागातील नळयोजनेचे पाणी शुध्दीकरण सुविधेअभावी नागरिकांना अनेक आजार उद्भवत असतात. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर विविध आजारांच्या साथी पसरत असतात. हे टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी फिल्टर केलेले शुध्द पाणी पिण्यासाठी वाॅटर फिल्टरचा नियमितपणे वापर करावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी केले आहे.
सेनीओरीटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, एजीएस कार्बन, नवी दिल्ली, ड्रीम बहुउद्देशिय संस्था , तिवसा आणि संदेश संस्था गडचिरोलीच्या वतीने पुलखल येथे नि : शुल्क केन्ट वाॅटर पुरिफायरचे वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, संदेश संस्थेचे संचालक डाॅ. गुरुदास सेमस्कर, चोखाजी बांबोडे, शेकाप महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, भाई अक्षय कोसनकर, गाव शाखा चिटणीस भाई रमेश ठाकरे यावेळी प्रामुख उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पुलखल येथील १९२ कुटूंबांना केन्ट प्युरिफायरचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पुलखल गाव शाखेचे खजिनदार कालिदास जराते, सहचिटणीस भास्कर ठाकरे, अनिल ठाकरे, युवक कार्यकर्ते महेंद्र जराते, सुरज ठाकरे, जितेंद्र कांबळे, गुरुदास मेश्राम, राजू भोयर, रमेश जराते, जितेंद्र कांबळे, हेमंत वाघरे, गिरीधर जराते,अरुण कोटगले, ईश्वर रेचनकर, हेमंत डहलकर, कालिदास गेडाम, राहुल जराते व पक्ष सभासदांनी परिश्रम घेतले.
0 Comments