गडचिरोली : तालुक्यातील विसापूर येथील भाऊजी दशरथ निखाडे यांच्या घरी राहून पदवीचे शिक्षण घेणारे व मूळचे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील बल्लारपूर येथील रहिवासी डिसेंबर राजीराम दिवटे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 ऑगस्ट रोजी पीएसआयपदी निवड झालेल्या उमेदवारांची जनरल लिस्ट प्रसिद्ध केली. यात डिसेंबर दिवटे यांना 213 वी रॅंक मिळाली. त्यांना 440 गुणांपैकी एकूण 326 गुण मिळाले. डिसेंबर यांनी एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी मित्रांच्या सोबतीने पुणे येथे सातत्य पूर्ण अभ्यास केल्याने त्यांची या यशाला गवसणी घातली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडिल, भाऊजी, नातेवाईक व मित्र परिवाराला दिले आहे. विशेष म्हणजे, ते सध्या शिक्षक पदावर कार्यरत होते.
0 Comments