१० वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा करणाऱ्या "जिल्हा विकासातील भागीरथाचे वचनपूर्तीचे दशक" माहिती पत्रकाचे विमोचन
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील माझ्या जनतेने मला निवडून देऊन दहा वर्ष काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा आपण प्रयत्न केला केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम केले. या १० वर्षाच्या कालावधीमध्ये आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मागील ५० वर्षात कधीच न झालेली कामे पूर्ण करण्याचा यथोचित प्रयत्न केला. त्या कामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न मी या "जिल्हा विकासातील भागीरथाचे वचनपूर्तीचे दशक" या माहिती पत्रकातून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हा भाजपा महामंत्री सौ योगिताताई पिपरे ,तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटी शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा युवा मोर्चा महामंत्री मधुकरराव भांडेकर, शहराच्या अध्यक्ष कवीताताई उरकुडे, तालुक्याचे महामंत्री बंडू झाडे ,अनुसूचित जातीचे जनार्दनजी साखरे ,शहराचे महामंत्री विवेक बैस, तालुका महामंत्री देवानंद चलाख, भाजप नेते यशवंत झरकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार डॉ देवराव होळी म्हणाले की, कोटगल बॅरेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोनसरी सुरजागड पोलाद कारखाना, नगरपंचायतिंची निर्मिती, जिल्हा स्टेडियम, महिला व बाल वाढीव रुग्णालय , हजारो कोटींच्या रस्त्यांची, पुलांची कामे, तालुका क्रीडांगणे , बस स्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय , प्रशासकीय भवनांची निर्मिती , सह अनेक मोठी कामे आपण केलेली आहे. जिल्हा निर्मितीच्या इतिहासात कधी नवे एवढी कामे या १० वर्षाच्या कालावधीत झाली असल्याचा पुनरुचार त्यांनी याप्रसंगी केला.
0 Comments