संघाच्या पथ संचलन व विजयादशमी उत्सवात आमदार डॉ देवरावजी होळी पूर्णवेळ उपस्थित


गडचिरोली नगराचा विजयादशमी व शस्त्र पूजन  उत्सव 


 गडचिरोलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली नगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजन कार्यक्रम तुळजाभवानी प्राथमिक शाळा आरमोरी रोड गडचिरोली येथे  उत्साहात संपन्न झाला. या पथसंचलनाला व शस्त्रपूजन कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पूर्ण वेळ उपस्थित दर्शविली.

सायंकाळी चार वाजता शहराच्या मुख्य मार्गाने पतसं चलन काढण्यात आले व त्यानंतर संपन्न झाला या पथसंचलनात आमदार डॉक्टर देवरावजी होळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताचे संपर्कप्रमुख अरविंद जी कुकडे प्रमुख अतिथी लॉर्ड मेटल्सचे संचालक कर्नल  मेहताजी, नगर संघ चालक नीलकंठजी भांडेकर ,जिल्हा संघचालक घिसूलालजी कावरा,  मंचावर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments