गडचिरोली : स्थानिक शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा महाविद्यालयात आज दिनांक 7 ते 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत 58 महाविद्यालयाच्या चमू या स्पर्धेत सहभागी झाल्या.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय डॉक्टर विवेक गोरलावार सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर संजय गोरे व माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर नंदाजी सातपुते उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम. जे मेश्राम यांनी भूषविले उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर विवेक गोरलावार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे आत्मबल वाढविले तसेच त्यांना कबड्डी स्पर्धे करता शुभेच्छा दिला कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर राजेंद्र गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संजय राऊत यांनी मानले.
0 Comments