गडचिरोली येथे कंत्राटदार व लाभार्थी संमेलनात शेकडो लाभार्थी व कंत्राटदारांची उपस्थिती
गडचिरोली : आपण मागील १० वर्षाच्या कार्यकाळात आपल्या संपर्कात येणाऱ्या व काम करून इच्छिणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम देण्याचा प्रयत्न केला असून त्यातून अनेक सक्षम कंत्राटदार तयार झाले असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील कंत्राटदार व लाभार्थी संमेलनाच्या प्रसंगी केले यावेळी मंचावर भाजपाचे जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे , शहराचे अध्यक्ष व कंत्राटदार मुक्तेश्वर काटवे , चामोर्शी नगरपंचायत चे उपाध्यक्ष राहुलभाऊ नैताम, पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा कंत्राटदार विलासभाऊ दशमुखे, शिवसेनेचे दीपक भाऊ भारसाकडे, भाजपा नेते तथा कंत्राटदार मधुकरराव भांडेकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले की मागणाऱ्या प्रत्येक हाताला काम देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे . काही लोकांना हजाराचा, काहींना लाखाचा तर काहींना कोटींचा लाभ विकास कामांच्या माध्यमातून आपण लाभ मिळवून दिला आहे . तरीदेखील अजूनही काही हातांना काम मिळालेले नाही याची आपल्याला जाणीव आहे. परंतु कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही आपण येणाऱ्या काळामध्ये अशा राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच कामाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देऊ असा विश्वास त्यांनी याप्रसंगी उपस्थित कंत्राटदार व लाभार्थ्यांना दिला. यावेळी कंत्राटदार व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments