गडचिराेली ः जिल्ह्यातील बेराेजगार युवकांची असलेली फाैज कमी करण्याच्या दृष्टीकाेनातून जिल्ह्यातील 'क' व 'ड' संवर्गातील पदे स्थानिक उमेदवारांकडूनच भरण्यात यावी, या मागणी करिता गाेंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांनी माेर्चा काढला हाेता.
या माेर्चाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यात वर्ग 3 व 4 ची पदभरती जिल्ह्यामध्येच घेण्यात यावी, ही तनुश्रीताईंसाेबत असलेल्या युवकांची रास्त मागणी आहे. असे हाेने अपेक्षित आहे. जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच बाहेर जिल्ह्यातील कर्मचारी गडचिरोली जिल्ह्यात एक-दाेन वर्षे काम करून बदली करून घेतात. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक विभागांतील जागा रिक्त राहत असतात.
बदलींमुळे मध्यंतरीच रिक्त हाेणारे पद भरण्यास बराचसा कालावधी लागत असताे. ही समस्या सुद्धा मार्गी लागेल. त्यामुळे पाेलिस भरती प्रमाणेच वर्ग 3 व 4 ची पदभरती स्थानिक पातळीवरच केली जावी, ही रास्त मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नक्कीच पाेहचवून सविस्तर चर्चा करणार असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवार (ता. 8) एका कार्यक्रमात दिली.
0 Comments