क्रिकेटर रवि शास्त्री उद्घाटनाला उपस्थित राहणार
गडचिरोली : लॉयड मेटल च्या वतीने येत्या ५ फेब्रुवारी पासून येथील जिल्हा प्रेक्षगार स्टेडियमवर 'लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग' (जीपीएल)क्रिकेट स्पर्धेचे (लेदर बॉल) आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व सामने दिवस-रात्र खेळवल्या जाणार आहेत.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रवि शास्त्री यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती एस. एस. खांडवावाला पूर्व डिजीपी गुजरात तथा BCCI अँटी करप्शन ब्युरो यांनी आज दुपारी चंद्रपूर रोड स्थित हॉटेल लँडमार्क मध्ये पार पडलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला कर्नल मेहता,भोलू सोमनानी,मंगेश देशमुख हजर होते.
या स्पर्धेत जिल्ह्याभरातील १६ संघ सहभागी होणार आहेत. ४ ग्रुप मध्ये संघ विभागणी करण्यात आली आहे.४ ग्रुप मधून पहिले दोन अव्वल संघ एकमेका विरोधात क्वार्टर फायनल खेळणार आहेत त्यानंतर विजेता होणारा सेमीफायनल व त्यातून विजेता होणारा यांच्यात अंतिम सामना होणार आहे.अंतिम सामना हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी होणार आहे.
'लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग' (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. ११ लाख ११ हजार ११ रुपये असणार आहे, द्वितीय पारितोषिक रु. ७ लाख आणि तिसरा ५ लाख रु.आहे. चौथा पारितोषिक २ लाख रु.असणार आहे. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच २५ हजार रु. क्वार्टर फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ५० हजार रु, सेमी फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ७५ हजार रु. व अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच १ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत.
ही स्पर्धा किमान १५ दिवस चालणार आहे. सामन्यातील पंच हे उच्च दर्जाचे राहणार आहेत.रनिंग कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध अँकरना आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण सामने यू ट्यूबवर थेट दाखवले जातील आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी ते पाहू शकतील, असेही पुढे सांगण्यात आले.ही स्पर्धा पुढील पाच वर्ष सतत चालणार आहे.
नव्या स्टेडियमची उभारणी करणार
लॉयड मेटल तर्फे आयोजित गडचिरोली प्रीमियर लीगला पुढील पाच वर्षात भरघोस प्रतिसाद मिळाला तर येत्या काळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये भव्य स्टेडियम उभारणार अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.
गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षणासाठी नागपूरला पाठवणार
'लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग' स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंना नागपूर येथील अकॅडमीत प्रवेश देणार असल्याची माहिती दिली आहे..
0 Comments