गडचिरोली : जिल्ह्यतील कूरखेडा तालुक्यातील छोटेसे गाव गुरनोली येथील रहिवाशी उद्योगपती व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांची आंतरराष्ट्रीय लंडन बुक ऑफ रेकॉर्ड करिता निवड करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्ह्यत तसेच महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यतील अनेक समस्याग्रस्त गावातील आवाज राज्य शासनासमोर मांडण्यात आला. त्या गावांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अतिसंवेदनशील नक्सलग्रस्त गावात आजपर्यंत डॉ प्रणय खुणे यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने पाचशे कि, मी, पेक्ष्या जास्त रस्ते तयार करून सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी बांधवाना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. या कामगिरीची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे चमूने गडचिरोली जिल्ह्यात येऊन घेतली. या कार्याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावरील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड करिता त्यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशचे वतीने, विदर्भ मानवाधिकार संघटना व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी डॉ प्रणय भाऊ खुणे मित्र परिवार यांचे वतीने डॉ, प्रणय खुणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments