- कामाची त्रिस्तरीय चौकशी करण्याची मागणी
गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग नागपूर अंतर्गत आलापल्ली-भामरागड 130 डी या राष्ट्रीय मार्गाअंतर्गत येत असलेल्या बंडिया नदीवर पुलाचे तसेच सिमेंट रस्ता बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे.
त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समितीद्वारे चौकशी करुन संबंधित कंत्राटदार तसेच जबाबदार संबंधित अधिका-यावर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी राष्ट्रीय महामार्ग नागपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता यांचेकडे निवेदनातू केली आहे.
बंडिया नदी पुचे स्लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात हनी कॉंबिंगचे प्याचेस टाकण्यात आले आहे. यामुळे पुलावरील पाणी आतमध्ये घुसून सळाखी सडून पुलाची मजबूती बाधित होण्याची शक्यता आहे. पुलाचे गडरचे ओतकाम अयोग्य असल्याने गडरची क्षमता नाजूर राहून पूजाची वजन धारण क्षमता कमी होण्याची चिन्हे आहेत. ठिकठिकाणी स्लॅपमधून पाणी गळणे, हनीकोंबिग, स्लॅप व गडरमधील सलाखी उघड्या दिसणे, गडबरमध्ये प्लायवुडचे तुकडे फसून असणे आदींमुळे संबंधित कंत्राटदार कामात निष्काळजीपणा दाखवित असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियमानुसार सिमेंट कॉंक्रिटची जाडी 250 एमएम असणे अनिवार्य असतांना केवळ 150 एमएम थिकनेस देऊन निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे.
या निकृष्ट दर्जाच्या बांधकामास कंत्राटदारासह संबंधित विभागाचे अधिकारीही तेवढेच जबाबर असल्याने त्यांचेवर दंडात्मक तसेच फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, कंत्राटदाराचे देयके थांबविण्यासह सदर कामाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रियस्त समितीची नेमणूक करण्यात यावी, अन्यथा न्यायालयाचे दार थोटावणार असा इशारा जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी नागपूर राष्ट्रीय महामार्गा मंडळाचे अधीक्षक अभियंता यांचेकडे निवेदनातून केली आहे.
0 Comments