नागरिकांच्या सतर्कतेसाठी आरोग्य विभागाने केल्या सुचना
गडचिराेली : सोमवार 21 एप्रिलला गडचिरोली जिल्ह्याचा तापमान 43 डि. से. वर पाेहचला. त्यामुळे नागरिकांना दिवसभर कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. सकाळी 10 वाजतापासूनच जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर शुकशुकाट दिसून आला. संध्याकाळी सुद्धा तापमान कमी न झाल्यामुळे शहरातील नागरिकांची वर्दळ कमी दिसून आली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या उकाड्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये साधारतः 72 टक्के जंगल उपलब्ध आहे. असे असतानासुद्धा यावर्षी नागरिकांना उकाड्याने चांगलाच दमछाक आणला आहे. सोमवारी जिल्ह्याचा तापमान 43 डि. से. होता. चिळचिळी उन आणि दिवसभर चालणाऱ्या गरम हवेमुळे शहरातील बहुतेक रस्ते निर्मनुष्य दिसून आली. शहरातील कॉम्प्लेक्स येथील शासकीय कार्यालय परिसरात सुद्धा दिवसभर शुकशुकाट दिसून आला. कार्यालयातील कर्मचारीदेखील दिवसभर आपल्या कक्षात बसून असल्याचे दिसून आले. संध्याकाळपर्यत उकाडा कमी न झाल्यामुळे नागरिकांना गरमीचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी उकाड्यापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्या, ओआरएस चा वापर करने, कडक उन्हात बाहेर न निघता थंड हवेच्या ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्यासंबंधी कोणत्याही प्रकारची बाधा उद्भवल्यास दवाखान्याशी संपर्क साधण्याच्या सुचना डॉ. शिंदे यांनी केल्या आहेत.
0 Comments