घाटीच्या नागरिकांसाठी 15 मे पर्यंत होणार पाणीपुरवठा योजना सुरू
गडचिराेली : कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे मागील काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. नळ योजनेचे काम तत्काळ पूर्ण करून घाटीतील नागरिकांना पाण्याची व्यवस्था करण्याच्या मागणीला घेवून सोमवारी 21 एप्रिलला गावातील बसस्टॅटजवळ चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनाच्या पूर्वीच ग्रामीण नळयोजनेचे अधिकारी व आमदार रामदास मसराम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत 15 मे पर्यंत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन स्थगित केले.
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण नळयोजना विभागाच्या वतीने घाटी गावाकरिता नळयोजना मंजुर केली आहे. परंतु या योजनेचे काम संथगतीने सूरू आहे. परिणामी तडपत्या उन्हात गावकऱ्यांना वनवन भटकावे लागत आहे. पाण्याच्या भिषण संकटापासून बचावाकरिता सोमवारी घाटी येथील बसस्टँडच्या मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रामदास मसराम, नळयोजना विभागाचे अभियंता पृथ्वीराज गेडाम, एस, एम, देविकर, कनिष्ठ अभियंता सोनाली येवले, पुराम आदी आंदोलनकर्त्यांना भेट देवून चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी 15 मे च्याआधी नळ योजनेचे काम पूर्ण करून पाणी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आयोजि आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्र चंदेल समवेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, शिवसेनेचे कुरखेडा तालुका अध्यक्ष आशिष काळे, गुणवंत कवाडकर, दशरथ लाडे, सरपंच मोहिनी गायकवाड, उपसरपंच फाल्गुन फुले, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ तलांडे, सुनिता मडावी, नीलम भोयर, लक्ष्मण बावने, उद्धव गहाने, भाऊराव कवाडकरसह घाटीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments