पाकिस्‍तान विरोधात नारेबाजी: दहशतवाद्यांचे जाळले पुतळे



अहेरी :  काश्मिर येथील पहलगाव येथे झालेल्‍या दहशतवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे 28 भारतीय पर्यटकांचा मृत्‍यु झाला. या घटनेच्‍या विरोधात गुरूवार (ता.24) च्‍या रात्री शहराच्‍या मुख्य चौकात हिंदूत्‍ववादी संघटनांनी पाकिस्‍तान विरोधी नारेबाजी करीत दहशतवाद्यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी दोन मिनिटाचे मौन पाळून मृतक पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हे आंदोलन विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्‍या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments