जिल्‍ह्‍यात शनिवारपासून चार दिवस पावसाची शक्‍यता




लखलखत्‍या उन्‍हापासून नागरिकांना मिळणार उसंत 


गडचिराेली ः  मागील काही दिवसांपासून तापमाणाची तीव्रता वाढत असतानाच प्रादेशिक हवामान विभागाने जिल्‍ह्‍यात शनिवारपासून चार दिवस विजांचा कडकडाट, सोसाट्याच्‍या वाऱ्यासह पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. जिल्‍ह्‍यात तीन दिवसांकरिता यलो तर एक दिवस ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आले आहे. या चार दिवसांत बहुतांश ठिकाणी पावसाची रिपरिप राहील तर रविवारी ऑरेंज अलर्टच्‍या दिवशी सर्वत्र सोसाट्याच्‍या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे. हवामान खात्‍याने वर्तविलेल्‍या पावसाच्‍या शक्‍यतेमुळे जिल्‍हावासियांना उकाड्यापासून उसंत मिळणार आहे.  तर या अवकाळी पावसामुळे विटभट्टी, भाजीपाला, मका उत्‍पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. 

गडचिरोली जिल्‍ह्‍यासह नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या पाच जिल्‍ह्‍यांतसुद्धा यलो व ऑरेंज अर्लट घाेषित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments